सावधान! रोहिंग्या मुसलमान नागालँडवर हल्ल्याच्या तयारीत

19

सामना ऑनलाईन, नवी दिल्‍ली

नागालँडमध्ये आश्रय घेतलेले रोहिंग्या मुसलमान तेथे दहशतवादी कारवाया करून नागालँडवर ताबा मिळविण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.

जर रोहिंग्या मुसलमानांना हिंदुस्थानातून परत पाठविण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला तर नागालँडवर हल्ला करुन त्यावर ताबा मिळविण्याची योजना रोहिंग्या दहशतवाद्यांनी आखली आहे. त्यामुळे नागालँडमधील सीमा भागात, महत्त्वाच्या ठिकाणांवर व रोहिंग्या मुसलमानांच्या आश्रय केंद्रांवर सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

रोहिंग्या मुसलमान पाकिस्तानच्या जमात-उद-दावा, अल-कायदा, लश्कर-ए-तोयबा आणि इसिसच्या मदतीने नागालँडमध्ये हल्ले घडवून आणणार आहेत. नागालॅण्डमधील विविध भागांची रेकी करण्यात येत असून त्यासाठी तब्बल २० दहशतवादी बांगलादेशमार्गे नागालँडमध्ये घुसले आहेत. तसेच या हल्ल्यासाठी बांगलादेशमधून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रांचा साठा नागालँडमध्ये आणण्यात आला आहे. नागालँडमधील काही मौलवी देखील या दहशतवाद्यांसोबत सामिल असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी राज्य सरकार व केंद्र सरकारला कळविले आहे.

रोहिंग्या मुसलमानांना हिंदुस्थानात आश्रय देण्याला विरोध करताना रोहिंग्या मुसलमानांचे लश्कर-ए-तोयबा आणि इसिसच्या दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते.

आपली प्रतिक्रिया द्या