राम शिंदेंनी ‘डिवचलं’, रोहित पवारांनी ‘खिजवलं’, नगरचं राजकारण फॉर्मात

8706

‘राम शिंदे काय म्हणतात, त्यापेक्षा माझ्या मतदार संघातील लोक काय म्हणतात, हे माझ्यासाठी जास्त महत्वाचे आहे. शिंदे यांना दुसरा कुठलाही विषय मिळत नसल्यामुळे ते माझ्याबाबत बोलत असतील. मात्र मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. माझ्या मतदारसंघातील जे लोक 30 वर्षांपासून विकास कामापासून वंचित आहे, त्यांच्या विकासासाठी काय करता येईल, याकडे लक्ष देत आहे’, असे आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. नगरचे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते.

‘माझा बाप मुख्यमंत्री, आमदार, खासदारही नव्हता’, शिंदे-विखे कुटुंबामध्ये वाकयुद्ध रंगले

राम शिंदे यांनी आपल्या मतदारसंघातील विकास कामांचे उद्घाटन हे राजशिष्टाचाराला धरून नाही, असे वक्तव्य केले होते. त्यावर विचारले असता, आमदार रोहित पवार म्हणाले की, मी राम शिंदे यांच्या वक्तव्याला महत्त्व देत नाही. त्यांच्याकडे कोणताच विषय नसल्यामुळे जाते अशा पद्धतीने बोलत असतील. पण त्याकडे मी लक्ष देत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

कामांमध्ये गैरव्यवहार – मुश्रीफ
जलयुक्त शिवार अभियान असो किंवा टँकर असो ज्या ठेकेदारांना कामे दिलेली होती, त्यांनी व्यवस्थितरित्या ती पार पाडलेली नाही, असे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये गैरव्यवहार झालेला आहे, अशी बाब निदर्शनास आलेली आहे. त्यासंदर्भात आम्ही आजच्या झालेल्या बैठकीमध्ये त्याबाबतची तक्रार केलेली आहे. त्या अनुषंगाने या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे पालकमंत्री मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या