… तर 2024 मध्ये शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात, रोहित पवारांचा ठाम विश्वास

1183

आगामी लोकसभा (2024) निवडणूक महाविकास आघाडीने एकत्र लढल्यास मराठी माणून पंतप्रधानपदावर बसल्याशिवाय राहणार नाही, असे विधान कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे. संभाजीनगरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना रोहित पवारांनी हे विधान केले आहे.

ते पुढे म्हणाले, पवार साहेब अजूनही तरुण असून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. लोकसभेच्या वेळी म्हणजेच 2024 ला एकत्र लढलो तर मराठी माणूस पंतप्रधानपदावर बसल्याशिवाय राहणार नाही. महाविकास आघाडी जशी राज्यामध्ये एकत्र आहे, तशी देशामध्येही एकत्र लढली तर सर्वांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण होईल, असा ठाम विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

पवार साहेबांना सामान्यातला सामान्य माणूसही ओळखतो. ते कुठेही गेले की लोकांची आत्मीयतेने विचारपूस करतात. साहेबांचा लोकांवर आणि लोकांचा साहेबांवर विश्वास आहे. लोकांचा विश्वास नसल्यास एखाद्या नेत्यालाही हातात बुट घ्यावे लागतात, अशा प्रकारचा विश्वास आम्हाला नको, असे म्हणत रोहित पवारांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.

fadvavis

तसेच भारतीय जनता पक्षाचे नेते महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार फोडण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना मी हे सांगू इच्छितो की किती प्रयत्न केले तरीही यश मिळणार नाही. त्यांनी आशेवर राहू नये. सुधीर मुनगंटीवार यांनी अशी आशा अनेकदा व्यक्त केली. मात्र त्यांना यश मिळणार नाही, असाही टोला रोहित पवारांनी लगावला.

आपली प्रतिक्रिया द्या