#INDvPAK इतिहास घडला, दिग्गजांना जमले नाही ते रोहित-राहुलने करून दाखवलं

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुलने दिग्गजांना जे जमले नाही ते करून दाखवले. वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाकडून 100 धावांची सलामी देण्याचा अनोखा विक्रम रोहित आणि राहुलच्या नावावर जमा झाला आहे. या दोघांनी 136 धावांची सलामी दिली. लोकेश राहुल 57 धावांवर बाद झाला आणि ही जोडी फुटली.

टीम इंडियाने वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध 1992 ते 2015 पर्यंत सहा लढती खेळल्या आहेत. या सहाही लढती टीम इंडियाने जिंकल्या असल्या तरी एकाही लढतीत 100 पेक्षा जास्त धावांची सलामी देणे दिग्गज फलंदाजांनाही जमलेले नाही.

1992 ते 2019 पर्यंत वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाच्या फलंदाजांनी दिलेली सलामी –

  • वर्ल्डकप 2019 – रोहित-राहुलने दिली 136 धावांची सलामी
  • वर्ल्डकप 2015 – रोहित-धवनने दिली 34 धावांची सलामी
  • वर्ल्डकप 2011 – सचिन-विरूने दिली 48 धावांची सलामी
  • वर्ल्डकप 2003 – सचिन-सेहवागने दिली 53 धावांची सलामी
  • वर्ल्डकप 1999 – सचिन-एस रमेशने दिली 37 धावांची सलामी
  • वर्ल्डकप 1996 – सिद्धू-सचिनने दिली 90 धावांची सलामी
  • वर्ल्डकप 1992 – जडेजा-श्रीकांतने दिली 25 धावांची सलामी