फलंदाजी क्रमवारीत रोहित शर्माची झेप

34

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

‘टीम इंडिया’चा सलामीवीर रोहित शर्माला श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील सुरेख कामगिरीचा मोठा फायदा झाला. ‘आयसीसी’ने सोमवारी जाहीर केलेल्या एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत रोहितने पाचव्या स्थानी झेप घेतली. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी विश्रांती घेतलेला विराट कोहली या क्रमवारीत अव्वल स्थानी कायम आहे. श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा हिंदुस्थानचा प्रभारी कर्णधारही होता. हिंदुस्थानने ही मालिका २-१ फरकाने जिंकली. या मालिकेतील दुसऱया लढतीत रोहितने नाबाद २०८ धावांची खेळी करून कारकीर्दीतील तिसरे द्विशतक ठोकण्याचा पराक्रम केला. कोहली ८७६ गुणांसह वन डेमध्ये फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. रोहितने ८१६ गुणांसह दोन स्थानाने प्रगती करताना पाचव्या स्थानी झेप घेतली. दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स, ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर अनुक्रमे दुसऱया व तिसऱया स्थानी आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या