रोहित शेट्टीचा ‘सिंघम’ आता छोटय़ा पडद्यावर

72

सामना ऑनलाईन । मुंबई 

रोहित शेट्टी आणि अजय देवगण या जोडीच्या ‘सिंघम’ने मोठय़ा पडद्यावर अक्षरशः धुमाकूळ घातला. ‘आता माझी सटकली’ म्हणत गुंडांना धडा शिकवणारा सिंघम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तोदेखील छोटय़ा पडद्यावर. यावेळी मात्र अजयऐवजी ‘लिटिल सिंघम’ छोटय़ा दोस्तांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. रिलायन्स अॅनिमेशन, डिस्कव्हरी किडस् आणि रोहित शेट्टी यांनी ‘लिटिल सिंघम’ या कार्टून शोची निर्मिती केली आहे. २१ एप्रिलपासू‘ डिस्कव्हरी किडस्’वर हा शो पाहता येणार आहे. ‘पोलीस की वर्दी, शेर का दम, नाम है मेरा…लिटिल सिंघम’ अस म्हणत नुकताच या शोचा धमाकेदार प्रोमो लाँच झाला आहे. याबद्दल दिग्दर्शक-निर्माता रोहित शेट्टी म्हणाला, सिंघम सिनेमाची निर्मिती केली तेव्हा या सिनेमाला प्रेक्षकांचे इतके प्रेम मिळेल याचा आम्ही विचार केला नव्हता. आजही ‘आता माझी सटकली’ हा डायलॉग लोकांच्या लक्षात आहे. सिंघमप्रमाणे लिटिल सिंघमही छोटय़ा दोस्तांचे नक्कीच मनोरंजन करेल.

आपली प्रतिक्रिया द्या