रोहीत वेमुला दलित नव्हता-गुंटूर जिल्हाधिकारी

सामना ऑनलाईन, हैदराबाद

हैदराबादमधील विद्यापीठामध्ये आत्महत्या करणारा रोहीत वेमुला दलित नव्हता असा अहवाल गुंटुरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात म्हटलंय. रोहीतने जातप्रमाणपत्र चुकीच्या मार्गाने बनवलं होतं असं या अहवालात म्हटलं आहे. इतकंच नाही तर आंध्र प्रदेश सरकारने आता रोहीत वेमुलाच्या आईला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे आणि २ आठवड्यात ते दलित आहेत हे सिद्ध करण्यास सांगितलं आहे.

१७ जानेवारी २०१६ ला रोहीत वेमुलाने हॉस्टेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. तिथल्या विद्यापीठाच्या कुलगुरूंनी रोहीत आणि ५ अन्य विद्यार्थ्यांना निलंबित केलं होतं. ज्यामुळे रोहीतने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला होता. रोहीत हा दलित असल्याने त्याच्यावर अन्याय करण्यात आल्याचे देखील आरोप झाले, ज्यामुळे हैदराबाद विद्यापीठाच्या परिसरात विद्यार्थ्यांचं प्रचंड मोठं आंदोलन उभं राहीलं होतं, या आंदोलनाचं लोण देशाच्या इतर भागातही पसरलेलं बघायला मिळालं होतं.

जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल येण्यापूर्वी मनुष्यबळ विकास मंत्रालयाद्वारे या घटनेची चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना केली होती. या समितीने देखील रोहीत अनुसुचित जातीचा नव्हता असा अहवाल दिला होता. या समितीचे प्रमुख अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.के.रूपनवाल होते.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या