रोहित वेमुला दलित नव्हताच,नैराश्यामुळे केली आत्महत्या; चौकशी समितीचा अहवाल

10

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

हैद्राबाद विद्यापीठाचा विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येमुळे देशभर संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश सरकारला द्यावे लागले होते. या चौकशीचा अहवाल सार्वजनिक करण्यात आला असून यामध्ये म्हटलं आहे की रोहित वेमुलाने आत्महत्या काही कारणांमुळे आलेल्या नैराश्यामुळे आणि वैयक्तिक कारणांमुळे केली होती. रोहित वेमुला आणि त्याच्या ४ मित्रांची विद्यापीठाच्या हॉस्टेलमधून हकालपट्टी केल्याने आत्महत्या केल्याचा आरोप केला गेला होता.

मनुष्यबळ विकास मंत्रालयाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश ए.के.रूपनवाल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. त्यांनी दिलेल्या अहवालात म्हटलंय की आत्महत्येपूर्वी रोहित वेमुलाने लिहलेल्या चिठ्ठीतून त्याच्यापुढे काही समस्या आहेत, जगात सुरू असलेल्या गोष्टींवर तो खूश नाही असं स्पष्टपणे जाणवतं. त्याला कोणत्या समस्यांचा त्रास होता हे त्यालाच माहिती असावं असं अहवालात म्हटलंय. आपण लहानपणापासून एकटे आहोत, माझं कधी कौतुक केलं गेलं नाही अशा वाक्यांमधून तो निराश असल्याचं वारंवार जाणवत असल्याचं चौकशी समितीचं म्हणणं आहे. जर वेमुला याला विद्यापीठाच्या कार्यशैलीबाबत आक्षेप असता तर त्याने त्याबाबत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या लिहलं असतं, मात्र तसं आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठीत तसंच काहीच दिसत नससल्याचं चौकशी समितीचं म्हणणं आहे. रोहित वेमुलाच्या जातीबद्दलही अहवालात तपशीलवार लिहण्यात आलं आहे. रोहित वेमुलाची आई ही  वढेरा समुदायाची होती.तो अनुसुचित जातीचा नव्हता, त्यामुळेच त्याच्याकडचा अनुसूचित जातीचा असल्याचा दाखला हा देखील खोटा आहे.

नोव्हेंबर २०१५मध्ये एका एबीव्हीपीच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याच्य़ा आरोपाखाली रोहित वेमुला आणि त्याच्या मित्रांना हॉस्टेलमधून बाहेर काढण्यात आलं होतं. या कारवाईमुळे हॉस्टेलच्याच खोलीत रोहितने आत्महत्या केली होती. या घटनेनंतर संपूर्ण देशभरात संतापाचा आगडोंब उसळला होता. विरोधी पक्षांनी देखील हा मुद्दा लावून धरण्याचा प्रयत्न केला होता. तत्कालीन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी आणि भाजपा खासदार बंजारू दत्तात्रेय यांच्यावर रोहितवर कारवाईसाठई विद्यापीठावर दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला होता. या दोघांनाही चौकशी समितीने क्लीन चीट दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या