इटालियन ओपन टेनिस स्पर्धेत पोलंडच्या इगाचे घवघवीत यश

पोलंडची 19 वर्षीय टेनिसपटू इगा स्वीयतेक हिने रविवारी देदीप्यमान कामगिरी केली. इगा स्वीयतेक हिने इटालियन ओपन या टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम लढतीत कॅरोलिना फ्लिस्कोवा हिचा 6-0, 6-0 अशा फरकाने धुव्वा उडवला आणि जेतेपदाची माळ आपल्या गळय़ात घातली. या संपूर्ण लढतीत तिने फक्त 13 गुण गमावले. इगा स्वीयतेक हिने अवघ्या 45 मिनिटांमध्ये हा विजय मिळवला. तसेच हे तिचे पहिले मास्टर्स जेतेपद ठरले हे विशेष!

आपली प्रतिक्रिया द्या