चॅम्पियन्स लीग फुटबॉल: रोनाल्डोचा 125वा गोल, युवेंटस्-एजाक्समध्ये 1-1 अशी बरोबरी

91

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

गेली अनेक वर्षे रियाल माद्रिदसाठी मोलाची कामगिरी बजावणाऱया ख्रिस्तियानो रोनाल्डो या दिग्गज फुटबॉलपटूने युवेंटस् या इटलीतील क्लबसाठी खेळताना धडाकेबाज कामगिरी केली. त्याने केलेल्या एकमेव गोलच्या जोरावर युवेंटस् व एजाक्समध्ये 1-1 अशी बरोबरी झाली. ख्रिस्तियानो रोनाल्डोचा हा 125वा गोल ठरला हे विशेष. आता चॅम्पियन्स लीग या प्रतिष्ठsच्या फुटबॉल स्पर्धेतील दोन संघांमधला उपांत्यपूर्व फेरीचा दुसऱया लेगचा सामना 16 एप्रिल रोजी टय़ुरीन येथे रंगणार आहे.

बार्सिलोनाने मँचेस्टर युनायटेडला हरवले
बार्सिलोनाने मँचेस्टर युनायटेडला पहिल्या लेगमध्ये 1-0 अशा फरकाने हरवले. ल्यूक शॉने ‘ओन गोल’ केल्यामुळे मँचेस्टर युनायटेडला पराभवाचा सामना करावा लागला. आता दोन संघांमध्ये 16 एप्रिलला दुसऱया लेगचा सामना होणार आहे. दरम्यान, अन्य उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या लेगमध्ये लिव्हरपूलने पोर्टोला 2-0 असे, तर टोटेनहॅम हॉटस्परने मँचेस्टर सिटीला 1-0 असे पराभूत केले

आपली प्रतिक्रिया द्या