रोनाल्डो रिआल माद्रिदला रामराम करणार

सामना ऑनलाईन । बार्सिलोना

करचुकवल्याचा ठपका पडल्यामुळे स्टार फुटबॉलपटू खिस्तीयानो रोनाल्डो आता रिआल माद्रिद हा क्लब सोडण्याच्या तयारीत आहे. अशी खात्रीलायक बातमी पोर्तुगाल येथील एका वृत्तपत्रामधून प्रसिद्ध करण्यात आली आहे. आपल्यावरील आरोपांमुळे व्यथित होऊन रोनाल्डोने हा निर्णय घेतल्याचं सांगितले जात आहे.

स्पॅनिश अधिकायांनी रोनाल्डोविरोधात १४.७ मिलीअन युरोज बुडवल्याचा दावा ठोकला आहे. मात्र रोनाल्डोने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. महत्वाची बाब म्हणजे या प्रकरणी रिआल माद्रिद रोनाल्डोच्या पाठीमागे भक्कम उभा होता. रोनाल्डोने कोणताही गैरव्यवहार केला नसल्याचं माद्रिदच्या व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यामुळे रोनाल्डो क्लब सोडत असलेल्या बातमीवर रिआल माद्रिदने अजुनही स्पष्टीकरण दिलेलं नाहीये.
चॅम्पियन्स लिगच्या अंतिम सामन्यात रोनाल्डोने केलेल्या २ गोलच्या बळावर रिआल माद्रिदने ज्युवेन्तस संघाचा ४-१ असा पराभव केला होता. पोर्तुगालच्या संघातही रोनाल्डोचा आतापर्यंत महत्वाचा वाटा राहिलेला होता. २००९साली मँचेस्टर युनायटेडला सोडचिठ्ठी दिल्यानंतर तब्बल ८ वर्ष रोनाल्डो रिआल माद्रिदसोबत कायम होता. रोनाल्डोच्याच काळात रिआल माद्रिदने चॅम्पियन्स लिग आणि ला लिग या स्पर्धेच दोन वेळा विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे रिआल माद्रिदचा कणा असलेला रोनाल्डो संघाला खरच रामराम करणार का हे पाहणं येत्या काही दिवसात महत्वाचं ठरणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या