Trailer out ‘रूही’ राजकुमार रावची नवी हॉरर कॉमेडी, ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती

roohi

बॉलीवुड अभिनेता राजकुमार राव, वरुण शर्मा आणि अभिनेत्री जाह्नवी कपूर यांची भूमिका असलेल्या चित्रपट ‘रूही’चा ट्रेलर मंगळवारी रिलीज करण्यात आला आहे. फिल्ममध्ये जाह्नवी कपूर एका भूतबाधा झालेल्या मुलीची भूमिका साकारत असल्याचं दिसत आहे. तर राजकुमार राव आणि वरुण शर्मा भयपटात हसवताना दिसतील. चित्रपटा ट्रेलर जाह्नवी कपूरने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर रिलीज केला आहे. ट्रलेरमधून या चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढते.

2018 मध्ये सत्य घटनेवर आधारित चित्रपट ‘स्त्री’ बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला होता. ‘स्त्री’ सारखाच भूताच्या कल्पनेवर आधारित हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे.

आपली प्रतिक्रिया द्या