Royal Enfield Hunter 350 रॉयल एनफील्डची सर्वात स्वस्त बाईक लॉन्च, किंमत फक्त…

तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या रॉयल एनफील्डने (Royal Enfield) आपली नवीकोरी ‘हंटर 350’ (Hunter 350) बाईक हिंदुस्थानमध्ये लॉन्च केली आहे. कंपनीने तीन व्हेरिएंटमध्ये ही बाईक लॉन्च केली असून रॉयल एनफील्डची ही सर्वात स्वस्त बाईक असल्याचे बोलले जात आहे. या बाईकसोबत कंपनीने दमदार फिचर्सही दिले आहेत.

रॉयल एनफील्डच्या ‘हंटर 350’ बाईकची किंमत 1.49 लाखांपासून 1.68 लाखांपर्यंत आहे. ही एक्स शोरुम किंमत असून ब्लॅक, फॅक्टरी सिल्व्हर, डॅपर ग्रे आणि रेबल रे या रंगामध्ये ही बाईक उपलब्ध आहे. या बाईकचा फ्रंट लूक स्पोर्टी असून तरुणांना तो अधिक आवडेल असे कंपनीने म्हटले आहे.

‘हंटर 350’च्या व्हीलबेसची लांबी 1370mm आहे. रॉयल एनफील्डच्या Meteor आणि Classic 350 या बाईकपेक्षा याची लांबी कमी आहे. साधारणत: रॉयल एनफील्डच्या बाईकमध्ये 15 लीटरची टाकी असते, मात्र ‘हंटर 350’मध्ये 13 लीटरची टाकी देण्यात आली आहे.

या बाईकमध्ये 349cc, सिंगल-सिलेंडर, 4-स्ट्रोक एयर-ऑयल कूल्ड इंजन देण्यात आले आहे. यात पाच स्पीड गियरबॉक्स देण्यात आली असून टॉप स्पीड 114kmph आहे. आआरवीएम आणि टेललाइट्स हे फीचर्सही यात देण्यात आले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sid Lal (@sidlal)

रॉयल एनफील्डच्या नवी मोटारसायकल ‘रॉयल एनफील्ड हंटर 350’ च्या मेट्रो व्हेरिएंटमध्ये अलॉय व्हील, डिस्क ब्रेक, ड्युअल चॅनल एबीएस, एलईडी टेल लॅम्प, राऊंड टर्न इंडिकेटर्स, Metepr 350 नुसार हँडल स्विच आणि इंस्ट्रूमेंट क्लस्टर आहे.

‘हंटर 350’ बाईकनंतर आगामी काळामध्ये कंपनी आणखी काही बाईक्स हिंदुस्थानमध्ये लॉन्च करण्याच्या तयारीमध्ये आहे. यात Shotgun 650 आणि Super Meteor 650 या बाईक्सचा समावेश आहे.