मुंबई सेंट्रल येथे बेशिस्त टॅक्सीचालकांवर आरपीएफची कारवाई

17

सामना ऑनलाईन, मुंबई

रेल्वे स्थानकाबाहेर बाहेरगावाहून आलेल्या अडल्यानडलेल्या प्रवाशांकडून अवाचे सवा भाडे आकारणाऱ्या टॅक्सीचालकांवर मुंबई सेंट्रलच्या रेल्वे सुरक्षा बलाने कठोर कारवाई केली आहे. मीटरने टॅक्सी न चालविणाऱ्या, जादा भाडे मागणाऱ्या आणि जवळचे भाडे नाकारणाऱ्या 22 टॅक्सीचालकांवर कारवाई करण्यात आली असून कोर्टाने त्यांना कोर्ट संपेपर्यंत कोर्टातच थांबण्याचे आणि 300 रुपये दंड भरण्याचे आदेश दिल्याने टॅक्सीचालकांचे धाबे दणाणले आहे.

मुंबई सेंट्रल टर्मिनस येथे राजधानीसारख्या खाडय़ांनी बाहेरगावाहून प्रवासी सतत येत-जात असतात. अशाच एका प्रवाशाला मीटरशिवाय घाटकोपरला जायचे 700 रुपये मागितल्याने त्याने आरपीएफकडे तक्रार केली. त्यानंतर अशा बेशिस्त वागणाऱ्या 22 टॅक्सीचालकांवर रेल्वे कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. तसेच लांबचे भाडे मिळण्यासाठी विनाकारण जागा अडवून ठेवणाऱ्या टॅक्सीचालकांवरही कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय काही जण महिनोन्महिने गाडय़ा पार्क करीत होते. त्यांच्या गाडय़ांना ट्रफिक पोलिसांच्या मदतीने टोईंग व्हॅन बोलावून हटविण्यात आल्याचे आरपीएफच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या