अजय देवगणमुळे ‘नाटू-नाटू’ गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला, वाचा अभिनेत्याने केलेले हे विधान

कपिल शर्मा शोच्या आगामी एपिसोडमध्ये भोला चित्रपटातील कलाकार चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येत आहेत. या भागाचा प्रोमो रिलीज झाला आहे. यामध्ये अजय देवगण, तब्बू आणि कपिल शर्मा दिसत आहेत. गप्पागोष्टी सुरू असताना अजय देवगणने आरआरआरला ऑस्कर मिळण्यामागचे मूळ कारण सांगितले आहे.

शोची सुरूवात आरआरआरने जिकंलेल्या ऑस्करने झाली. अजय देवगन RRR चित्रपटामध्ये कॅमिओच्या भूमिकेत दिसला होता. त्यामुळे कपिल शर्माने अजय देवगणला RRR च्या नातू नातू या गाण्याला ऑस्कर मिळाल्याबद्दल अभिनंदन केले. यावर नातू नातू गाण्याला माझ्यामुळेच ऑस्कर मिळाला आहे, असे अजयने म्हटले. त्याची ही प्रतिक्रिया ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले, व कसे काय असा प्रश्न केला. यानंतर चेष्टेने ‘कल्पना करा की त्या गाण्यात मी डान्स केला असता तर काय झाले असते?’ त्याच्या या उत्तराने सेटवर हशा पिकला.

अजय देवगणचा ‘भोला’ चित्रपट 30 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. ‘भोला’ हा साऊथ चित्रपट ‘कैथी’चा रिमेक आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत तब्बू, दीपक डोबरियाल आणि गजराज राव यांच्यासह अनेक मोठे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.