ऑस्कर सोहळय़ासाठी आरआरआरच्या टीमला मोजावे लागले 20 लाख

‘आरआरआर’ या चित्रपटातील ‘नाटू-नाटू’ या गाण्याला नुकताच ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. या ऑस्कर सोहळय़ाला उपस्थित राहण्यासाठी आरआरआरच्या टीमला प्रत्येकी 20 लाख रुपये मोजावे लागले आहेत.

ऑस्कर पुरस्कार सोहळय़ाच्या आयोजकांकडून पुरस्कार विजेत्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोणत्याही तिकिटाशिवाय उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाते. त्यानुसार संगीतकार एम. एम. किरवानी आणि गीतकार चंद्रबोस यांच्यासह त्यांच्या पत्नींना मोफत प्रवेश दिला होता, मात्र दिग्दर्शक राजामौली, रामचरण आणि ज्युनियर एनटीआर यांना मोफत प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीसाठी 25 हजार डॉलर म्हणजे 20 लाख रुपये मोजून खरेदी करावी लागल्याचे समोर आले आहे.