तुमच्या खिशातील सुटे पैसे नकली तर नाही ना?

53

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

उदयपूरमधील घंटाघर पोलिसांनी शनिवारी एका घरावर टाकलेल्या छाप्यात पाच रुपयांचे नकली नाणी बनवणाऱ्या गँगचा पर्दाफाश केला आहे. विविध धातुंचे मिश्रण, पितळ आणि स्टीलपासून नकली पाचची नाणी बनवण्याचा कारखाना त्याठिकाणी चालत होता. पोलिसांनी छापा टाकण्याआधीच आरोपींनी पाच लाख रुपयांचे नकली पाचचे नाणी बाजारात पाठवले आहेत. त्यामुळे तुमच्या हातातील सुटे पैसे नकली तर नाही ना हे आधी पाहून घ्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी खबऱ्यानं टीप दिल्यानंतर एका घरावर छापा टाकण्यात आला. त्याठिकाणी पाच रुपयांचे नकली नाणी बनवण्यासाठी लागणारे सामान, रंग आणि तयार नकली नाणी जप्त करण्यात आले. घरमालक ललित सोनीला अटक करण्यात आले आहे. मात्र आरोपींनी पाच लाख रुपयांचे नकली नाणी एका टोल चालकाला दिल्याचं सांगितलं.

याआधीही अशा घटना समोर आल्या आहेत. मागील वर्षी ७ ऑक्टोबरला दिल्ली पोलिसांनी दोन व्यक्तींना नकली नाण्यांसह अटक केली होती. त्यांच्याकडून सुटे पैसे बनवण्याची मशीन, चार लाख किंमतीचे पाच आणि दहा रुपयांचे नकली ठोकळे जप्त करण्यात आले होते. हे सर्व पैसे दिल्ली-एनसीआर, हरियाणा आणि राजस्थानमध्ये पाठवण्यात येणार होते.

आपली प्रतिक्रिया द्या