अयोध्या प्रकरणाचा निर्णय उदारपणे स्वीकारा, रा.स्व. संघाचे आवाहन

राम जन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे. न्यायालयाने आपला निर्णय राखीव ठेवला आहे.  8 नोव्हेंबरपर्यंत कधीही या प्रकरणी सुनावणी होऊ शकते. अनेक संस्था आणि पक्षांनी शांततेचे आवाहन केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.

संघाने एक ट्विट करून म्हटले आहे आहे की  काही दिवसांत श्रीराम जन्मभूमी वरील मंदिर निर्माण वादावरील सर्वोच्च न्यायायलाचा निर्णय येण्याची शक्यत आहे. जो काही निर्णय येईल तो खुल्या मनाने स्विकारला पाहिजे. निर्णयानंतर संपूर्ण देशातील वातावरण सौहार्द राहिले पाहिजे ही सगळ्यांची जवाबदारी आहे.”

संघाच्या आवाहनापूर्वी विश्व हिंदू परिषद आणि बबरी मशिदीचे पक्षकार इक्बाल अन्सारी यांनी निर्णयानंतर बंधुबाव राखण्याचे आवाहन केले होते.

प्रचारक वर्गाचे ठिकाण आणि वेळ बदलले

30 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान संघाचा प्रचारक वर्ग हरिद्वार मध्ये भरणार होता. परंतु काही कारणामुळे हा वर्ग पुढे ढकलण्यात आला आहे. तसेच हा वर्ग दिल्लीत भरणार आहे अशी घोषणाही संघाने केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या