राष्ट्रीय स्वयंसेवक संघ घेणार भाजप आमदारांची शाळा

सामना ऑनलाईन । नागपूर

हिवाळी अधिवेशनाचे निमित्त साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूरमध्ये मंगळवारी १९ डिसेंबर रोजी भाजप आमदारांची शाळा घेणार आहे. रेशीम बाग येथील डॉ. हेडगेवार स्मारक समितीच्या स्मृती मंदिरात हा वर्ग होणार आहे.

विधानसभा निवडणुकांचा मोसम सुरू झाल्यानंतर अनेकजण भाजपमध्ये डेरेदाखल झाले. यातील निवडक मंडळी सध्या आमदार आहेत. हे आमदार भाजपच्या तिकिटावर जिंकून आले असले तरी त्यांना संघ परिवाराची पार्श्वभूमी नाही. त्यामुळे बौद्धिक वर्गाच्या निमित्ताने आमदारांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ परिवार तसेच परिवाराचे महत्त्व आणि कार्य याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. भाजपचे १२२ आमदार बौद्धिक वर्गाला हजेरी लावणार आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी गेल्या वर्षी आमदारांना मार्गदर्शन केले होते. यावर्षी नेमके कोण मार्गदर्शन करणार हे अद्याप समजलेले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या