स्वातंत्र्यदिनी मदरशांत तिरंगा फडकणार,! संघाचे नेते इंद्रेश कुमार यांचे वक्तव्य

11

सामना प्रतिनिधी । डेहराडून

स्वातंत्र्यदिनी देशातील सर्व मदरशांमध्ये तिरंगा फडकेल. तसेच विद्यार्थी राष्ट्रगीत आणि वंदे मातरम् देखील गाणार असल्याचे राष्ट्रीय स्कयंसेकक संघाचे करिष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी म्हटले आहे. उत्तराखंडमधील मदरशांमध्ये 12 ते 15 ऑगस्टदरम्यान स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे.

डेहराडूनमध्ये राष्ट्रीय सुरक्षा जागरण मंचाकडून आयोजित कार्यक्रमात बोलताना इंद्रेश कुमार यांनी 15 ऑगस्टला सर्व मदरशांमध्ये ध्कजारोहण करण्याची जबाबदारी मुस्लिम राष्ट्रीय मंचाला देण्यात आल्याचे  सांगितले. स्वातंत्र्यदिनी मदरशांत आयोजित करण्यात येणार्‍या कार्यक्रमांत विद्यार्थ्यांना  देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात योगदान देणार्‍या क्यक्तिमत्त्कांची माहिती दिली जाईल असे ते म्हणाले.

उत्तराखंडमध्ये 700 हून अधिक मदरसे आहेत. यातील 300 हून अधिक मदरशांची नोंद राज्य सरकारकडे आहे. स्वातंत्र्यदिनी तिरंगा फडवकण्याबद्दल एक अधिकृत सूचना राज्यातील सर्व मदरशांना पाठवण्यात येईल अशी माहिती उत्तराखंड मदरसा बोर्डचे संचालक बिलाल रहमान यांनी दिली. विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व समजावे, त्यांना स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याची माहिती मिळावी हा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या