संघाचा विजयादशमी उत्सव यंदा मैदानाऐवजी सभागृहात

विजयादशमीनिमित्त सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले शस्त्रपूजन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगराचा विजयादशमी उत्सव यंदा 25 आक्टोबर 2020 रोजी साजरा होणार असून यावर्षी कोणतेही शारीरिक प्रात्यक्षिकांचे कार्यक्रम होणार नाहीत. या कार्यक्रमाला मोजक्याच संख्येत स्वयंसेवक उपस्थित राहणार असून सरसंघचालक डॉ. मोहन भागवत त्यांना मार्गदर्शन करतील. सरसंघचालकांचे भाषण फेसबुकच्या माध्यमातून देशभर दाखवले जाणार आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नागपुरातील विजयादशमी उत्सव हा अतिशय महत्वाचा कार्यक्रम मानला जातो. या कार्यक्रमात संघाचे सरसंघचालक जे मार्गदर्शनपर भाषण करतात ते संघाची पुढील वर्षभरातील नेमकी वाटचाल कशी असेल याचे दिशादर्शन करणारे असते. त्यामुळे माध्यमांसह देशभरातील संघप्रेमी आणि इतरही राजकीय कार्यकर्ते तसेच अभ्यासक यांचे या भाषणाकडे लक्ष लागलेले असते. नागपुरातील या कार्यक्रमाला सुमारे 5000 गणवेशधारी स्वयंसेवक आणि 20 ते 25 हजार नागरिक उपस्थित असतात त्याशिवाय माध्यमांच्याद्वारे हा कार्यक्रम देशभर दाखवला जातो.

हा कार्यक्रम दरवर्षी रेशीमबाग मैदानावर होत असतो. यंदा कोविडच्या परिस्थितीमुळे मोजकेच स्वयंसेवक उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे विजयादशमीच्या दिवशी सकाळी 7.30 वाजता हा कार्यक्रम रेशीमबाग परिसरातील महर्षी व्यास सभागृहात आयोजित केला असल्याची माहिती नागपूर महानगर संघचालक राजेश लोया यांनी दिली आहे

आपली प्रतिक्रिया द्या