रुबिना दिलैक ठरली ‘बिग बॉस’च्या 14व्या पर्वाची विजेती

बिग बॉसचे 14 वे रोमांचक पर्व अखेर समाप्त झाले आहे. रुबिना दिलैक हिने विजेतेपदाचा मान पटकावला आहे. अभिनेत्री बिग बॉसची ट्रॉफी आणि 36 लाखांची मानकरी ठरली आहे.

तर राहुल वैद्य या स्पर्धेचा उपविजेता ठरला आहे. तर निक्की तांबोळी ही दुसरी उपविजेती ठरली आहे. त्या आधी राखी सावंत हिने 14 लाख रुपये घेऊन शो सोडल्यामुळे टॉप थ्रीमधून ती बाहेर पडली होती.

रुबिना दिलैक हिने आपला पती अभिनेता अभिनव शुक्ला याच्यासोबत बिग बॉसच्या घरात प्रवेश केला होता आणि बिग बॉसच्या घरामधील चढ उताराच्या खेळात तिला बऱ्याच आव्हानांना सामोरे जावे लागले. खेळादरम्यान तिने चक्क बिग बॉसला चॅलेंज केले होते.


View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

या सर्वांतच, तिचा नवरा अभिनव शुक्ला याच्यावर केलेल्या टिप्पणीमुळे ‘सलमान खान’ सोबत मतभेद झाल्यावर तिने बिग बॉसचे घर सोडण्याची धमकी दिली होती. दरम्यान, अभिनव शुक्ला च्या समजवण्याने ती घरात राहण्यास तयार झाली होती.

या संपूर्ण चढ उताराच्या काळात तिने हिंमत न हरता सर्व खेळांमध्ये खिलाडू वृत्तीने खेळली. यानेच तिने प्रेक्षकाच्या मनात घर केलं आणि 150 दिवसांचा काळ पार करत बिग बॉसच्या 14 व्या पर्वाची विजेती ठरली.

आपली प्रतिक्रिया द्या