‘ही’ मराठी अभिनेत्री झाली आई, शेअर केला मुलीचा फोटो

2508

मराठी व हिंदी मालिकांमधून गाजलेली प्रसिद्ध अभिनेत्री रुचा हसबनिस हिने नुकतंच एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. रुचा हिने इंस्टाग्रामवरून तिच्या ही गोड बातमी सर्वांना दिली आहे. रुचाची खास मैत्रिण व सध्या बिग बॉसमुळे गाजत असलेली अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने तिचे अभिनंदन केलं आहे.

rucha-hasabnis-new

रुचा सध्या लाईमलाईटपासून दूर आहे. मात्र मराठी व हिंदी मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत काम केले आहे. हिंदीतील तिची साथ निभाना साथिया ही मालिका तसेच या मालिकेतील तिची राशी नावाची भूमिका प्रचंड गाजली. या मालिकेत रुचा विनोदी खलनायिकेच्या भूमिकेत दिसली होती. त्याआधी ती मराठी मालिका चार चौघी मध्ये दिसली होती. तसेच तिने सोनी वाहिनीवर ‘कॉमेडी सर्कस के तानसेन’ या कार्यक्रमातही ती दिसली होती. 2014 साली साथ निभाना साथिया ही मालिका बंद झाल्यानंतर 2015 मध्ये रुचाने राहुल जगदाळे नावाच्या तरुणासोबत लग्न केले असून नुकतंच तिने मुलीला जन्म दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या