संभाजीनगर महापालिकेत एमआयएमची गुंडागर्दी

19

सामना ऑनलाईन, संभाजीनगर

संभाजीनगर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ‘एमआयएम’च्या नगरसेवकांनीच सभागृहात पुन्हा गुंडागर्दी केली. ‘राजदंड’ पळवताना रोखल्याबद्दल त्यांनी अर्वाच्च शिवीगाळ करत सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. इतकेच नव्हे तर ‘एमआयएम’च्या नगरसेवकांनी भिरकावलेली खुर्ची थेट महापौर भगवान घडमोडे यांच्या अंगावर पडली.

या गंभीर प्रकारानंतर संतप्त झालेल्या महापौरांनी ‘एमआयएम’चे गोंधळ घालणारे नगरसेवक सय्यद मतीन आणि जफर बिलर, अजीम अहमद या तिघांचे सदस्यत्व कायमसाठी रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला. गोंधळामुळे तहकूब केलेल्या सभेला पुन्हा सुरुवात होताच शिवसेनेने गोंधळ घालणाऱया नगरसेवकांना सभागृहाबाहेर काढा, अशी मागणी केली. एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन व जफर बिल्डर यांचे सदस्यत्व कायमस्वरूपी रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर केले. तसेच या दोघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. हे दोन्ही सदस्य सभागृहात महापौरांना गयावया करू लागले.

– एमआयएम आमदाराची विनवणी
एमआयएमच्या दोन नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचे कळताच एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी महापौर भगवान घडमोडे यांची भेट घेऊन नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा अशी मागणी केली.

आपली प्रतिक्रिया द्या