बिग बॉसमधली ही अभिनेत्री आहे प्रेग्नेंट?

10

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेत्री नेहा धुपिया हिने नुकतीच सोशल मीडियावरून तिच्या प्रेग्नेन्सीची घोषणा केली आहे. नेहाकडील खूशखबरवर चर्चा रंगलेली असतानाच आणखी एका अभिनेत्रीकडे देखील लवकरच पाळणा हलणार असल्याची चर्चा सुरू आहे. बिग बॉस फेम अभिनेत्री किश्वर मर्चंट देखील गरोदर असल्याची चर्चा असून तिचा नवरा सुयश रायच्या सोशल मीडियावरील एका पोस्टवरून ही चर्चा सुरू झाली आहे.

अभिनेत्री नेहाच्या घरी ‘कुणी तरी येणार येणार गं…!’

suyash-kishwar-1

Jab bhi hoga aisa hoga ❤️

A post shared by “baba भannaaटी” BOB MARLEY (@suyyashrai) on

सुयश आणि किश्वर यांचे दीड वर्षापूर्वी अगदी थाटामाटात लग्न झाले. त्याआधी ते पाच वर्ष एकमेकांना डेट करत होते. सुयशने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक छोटुश्या बाहुल्याचा फोटो शेअर केला असून त्यासोबत ‘आम्हाला बाळ होईल ते असेच असेल’ अशी पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टवरून सुयश आणि किश्वर देखील गुड न्यूज देणार असल्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. अद्याप या दोघांनी अधिकृतरित्या काहीही जाहीर केलेले नाही.

summary : is kishwar merchant pregnant?

आपली प्रतिक्रिया द्या