
स्टारप्लस वाहिनीवरील अनुपमा ही मालिका प्रेक्षकांना आवडली आहे. ही मालिका पाहणाऱ्या दर्शकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून टीआरपीमध्येही ही मालिका अव्वल स्थानी आहे. या मालिकेच्या कलाकारांनी मालिका सातत्याने चांगली कामगिरी करत असल्याने जल्लोष साजरा केला. मालिकेतील आघाडीची अभिनेत्री रुपाली गांगुली हिने इन्स्टाग्रामवर या जल्लोषाचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
View this post on Instagram
रुपाली गांगुली हिने या प्रसंगी बोलताना म्हटले की 2016 साली तिने तिचेवडील गमावले होते. आपले दिवसातले 12 तास सेटवरच जात असून मला अनेकदा त्यांचा भास होतो असं तिने म्हटलं आहे. सेट मला घरासारखा वाटत असून मला इथं राहणं आवडत असल्याचं ती म्हणाली. या मालिकेमध्ये अनुपमाची व्यक्तिरेखा रुपाली गांगुली साकारत असून, अनुज कपाडियाच्या भूमिकेत गौरव खन्ना आणि वनराज शाहच्या भूमिकेत सुधांशू पांडे अभिनय करत आहेत.