रुपया पुन्हा घसरला : ४३ पैशांनी अवमूल्यन

सामना ऑनलाईन | मुंबई

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत गुरुवारी हिंदुस्थानी रुपयाची ४३ पैशांनी घसरण होत तो प्रति डॉलर ६९.०५ पर्यंत घसरला.फेडरल रिजर्वचे चेअरमन जेरॉम पॉवेल यांनी अमेरिकन संसदेत देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाल्याची टिप्पणी केली. या टिप्पणीनंतर रुपयाच्या घसरगुंडीला पुन्हा सुरुवात झाली.

आंतरबँक विदेशी मुद्रा बाजारात डॉलरला मोठी मागणी आल्याने सुरुवातीला रुपयाचे मूल्य प्रति डॉलर ६८.७२ पर्यंत घसरला. नंतर दिवस अखेर काहीसा सावरत रुपया ६९.०५ वर स्थिर झाला.

आपली प्रतिक्रिया द्या