स्पुटनिक! कोरोनावर रशियाची लस तयार; पुतिन यांनी मुलीलाच टोचली लस!

1246

अवघे जग ज्याची आतुरतेने वाट पाहत आहे ती कोरोना व्हायरसवरील लस अखेर रशियाने पहिल्यांदा विकसित केली आहे. राष्ट्रपती ब्लादिमिर पुतीन यांनी आज लसीला मंजुरी दिल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. स्पुटनिक-व्ही असे लसीचे नाव आहे. ही लस सुरक्षितच आहे हे जगाला दाखवण्यासाठी आणि जगाचा विश्वास बसावा यासाठी पुतीन यांनी आपल्या मुलीलाच ही लस टोचली. तिची प्रकृती उत्तम आहे.

कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजविला असून, रशियात 890000 वर रुग्णसंख्या गेली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमेरिकेसह जगभरात अनेक देशांत संशोधन सुरु आहे. ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीची तिसरी मानवी चाचणी होणार आहे. ऑक्सफर्डच्या लसीची निर्मिती पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये होणार आहे. मात्र, लस पूर्णपणे विकसित केल्याची पहिली घोषणा रशियाने केली आहे. लस शोधणारा पहिला देश रशिया ठरला आहे.

20 देशांमधून एक अब्ज डोसची मागणी

या लसीच्या एक अब्ज डोसची मागणी 20 देशांनी केली आहे. औद्योगिक पातळीवरील उत्पादन सप्टेंबर महिन्यात सुरू होईल आणि ऑक्टोबरमध्ये लस बाजारात येईल. दुसरीकडे चीनने ही लस आपल्या सैनिकांना देण्यास सुरुवात केली आहे.

काय आहे लस

  • पहिली आणि दुसरी क्लिनिकल ट्रायल झाली आहे. दोन्ही मानवी चाचणीचे अहवाल सकारात्मक आहे. तिसरी मास ट्रायल होणे बाकी आहे.
  • सुरुवातीला एक अब्ज डोस बनविण्यात येतील. शिक्षक आणि आरोग्य कर्मचाNयांना सुरुवातीला लस दिली जाईल. त्यानंतर रशियन जनतेसाठी लस उपलब्ध होईल.
  • लसीचे उत्पादन 5 अब्ज डोसपर्यंत वाढविण्यात येणार आहे.

माझ्या एका मुलीला ही लस टोचली असून, तिची प्रकृती उत्तम आहे. तिला लसीचे दोन डोस दिले आहेत. कोणतेही साईड इफेक्ट नाहीत.

  • लसीला ‘स्पुटनिक-व्ही’ हे नाव देण्यात आले आहे. 1957 मध्ये रशियाने जगात पहिल्यांदा sputnik v या नावाने उपग्रह अवकाशात सोडला होता. त्याचेच नाव कोरोनावरील लसीला दिले आहे. रशियाच्या गामालेया रिसर्च सेंटर ऑफ एपिडेमीलॉजी अॅण्ड मायक्रोबायोलॉजीने ही लस तयार केली आहे.

    डब्ल्यूएचओ मान्यता देणार, पण एका अटीवर!
    जागतिक आरोग्य संघटना या लसीला मान्यता देणार, पण प्री-क्वॉलिफिकेशन प्रक्रियेचे पालन रशियाला करावे लागणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या