रशियात आहे दुसरा बाबूराव, घरातच बसवली बियरची पाईपलाईन

111

सामना ऑनलाईन । मॉस्को

हेराफेरी या चित्रपटातील बाबुराव आपटे आठवतो का? घरावर दारुची टाकी बसवून नळातून येणारी दारु रिचवण्याचं स्वप्न तो पाहत असतो. बघायला आणि ऐकायला हा प्रसंग मजेशीर वाटत असला तरी रशियात मात्र असाच एक खराखुरा बाबूराव आहे. जो घरात बसून नळातून येणारी बियर पितो. अँड्री इरेमीव असे त्यांचे नाव आहे.

अँड्री बियरप्रेमी असून रोज दुकानात जाऊन बियर विकत घ्यायचा त्यांना कंटाळा यायचा. यामुळे घरातील नळातूनच बियर मिळावी असे त्यांचे स्वप्न होते. त्यातच त्यांनी ज्या अपार्टमेंटमध्ये घर घेतले त्याच्या खालीच बियरचे दुकान होते. यातूनच मग अँड्री यांना बियर पाईपलाईनची कल्पना सुचली. त्यानंतर त्यांनी बियर दुकानाच्या मालकाला याबद्दल विचारले. त्यानेही त्यास होकार दिला व त्याच्या दुकानातून थेट पाईपलाईनद्वारे अँड्री यांच्या घरात बियर पाठवण्याची तयारी दर्शवली. पण त्यासाठी अँड्री यांना बराच खटाटोप करावा लागला. बिल्डींगमधील सदस्यांची परवानगी, सरकारची परवानगी घ्यावी लागली. तसेच आवश्यक त्या कायदेशीर बाबीही पू्र्ण कराव्या लागल्या. त्यानंतर त्यांचे नळातून बियर प्यायचे स्वप्न खरे झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या