रशियातील शाळेत अंदाधुंद गोळीबार; सहा जणांचा मृत्यू, 20 जण जखमी

रशियाच्या इझवेस्क शहरातील एका शाळेत अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. या हल्ल्यात झालेल्या गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. रशियाच्या गृहमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे.

रशियन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी एक बंदूकधारी इसम येथील पुश्कींस्काया मार्गावरील एका शाळेत घुसला. त्याने सुरक्षा रक्षकाला गोळी मारली आणि तो शाळेत शिरला. शाळेत त्याने अंदाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली.

गोळ्यांचा आवाज ऐकून काही विद्यार्थी वर्गात जाऊन लपले. यानंतर तो हल्लेखोर शाळेच्या चौथ्या मजल्यावर जाऊन 403 क्रमांकाच्या खोलीत स्वतःवर देखील गोळी झाडली. या हल्ल्यात सहा जण ठार झाले आहेत, तर 20 जण जखमी आहेत. या हल्ल्यातून बचावलेल्या शिक्षक आणि मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे.