रशिया हिंदुस्थानात करणार कोरोना लसीच्या 10 कोटी डोसचा पुरवठा

592

रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडने (आयडीआयएफ) हिंदुस्थानात कोरोना प्रतिबंधक ‘स्पुटनिक व्ही’ या लसीची चाचणी आणि वितरणासाठी डॉ. रेड्डीज लॅब या कंपनीबरोबर करार केला आहे. त्या करारानुसार आयडीआयएफ या कंपनीला दहा कोटी डोस पुरवणार आहे. या लसीच्या चाचण्या यशस्वी झाल्या तर हिंदुस्थानात नोव्हेंबरपर्यंत ही लस उपलब्ध होईल असे आरडीआयएफचे सीईओ किरील दिमित्रिव यांनी म्हटले आहे.

हिंदुस्थानातील आणखी चार कंपन्यांबरोबरच आरडीआयएफची यासंदर्भात बोलणी सुरू आहे. ‘स्पुटनिक व्ही’ या लसीच्या अडीचशेपेक्षा जास्त चाचण्या झाल्या आहेत. ही लस सुरक्षित असून तिचे दीर्घकालिन साईड इफेक्ट्सही दिसेलेले नाहीत असा आयडीआयएफचा दावा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या