जय माहिष्मती! रशियातील घराघरात घुमल्या घोषणा

1697

बाहुबली चित्रपटाच्या दोन्ही भागांनी बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. कमाईचे सगळे रेकॉर्ड मोडणाऱ्या या दोन्ही चित्रपटांमुळे प्रभास आणि अनुष्का शेट्टी यांचे जगभरात फॅन तयार झाले. देशात जितका हा चित्रपट प्रसिद्ध झाला तितकाच तो विदेशातही झाला. अन्य देशांमध्येही या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. हे दोन्ही भाग इतके प्रसिद्ध झाले आहे की ते रशियामध्ये टीव्हीवर रशियन भाषेत भाषांतरीत करून दाखवण्यात येत आहेत.

रशियातील हिंदुस्थानी दूतावासाने एक ट्विट केलं असून यामध्ये बाहुबली देवसेनेसोबत दरबारासमोर हजर होतो ते दृश्य दाखवण्यात आलं आहे. रशियन भाषेमध्ये संभाषण डब करण्यात आलं असून दूतावासाने म्हटलंय की ‘हिंदुस्थानी सिनेमाला रशियात वाढती प्रसिद्धी मिळायला लागली आहे. पाहा सध्या रशियातील टीव्हीवर काय दाखवलं जात आहे. रशियन भाषांतरीत बाहुबली’

आपली प्रतिक्रिया द्या