Photo Story – जगातील सर्वात सुंदर चिमुरडी, दिसते जणू परीच

1663

विश्वसुंदरी किंवा ब्रह्मांड सुंदरीसाठी होणाऱ्या स्पर्धांबाबत आपण नेहमीच ऐकले आहे. जगातील सर्वात सुंदर आणि बुद्धिमान महिलेला हा रुबाब मिरवायला मिळतो. परंतु रशियामध्ये एका 6 वर्षीय चिमुरडीला जगातील सर्वात सुंदर चिमुरडीचा किताब मिळाला आहे.

yalina2

रशियात राहणाऱ्या या सुंदर चिमुरडीचे नाव आहे यलीना यकूपोवा. चार वर्षाची असल्यापासून यलीना मॉडेलिंग करते. तिचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. तिचा फोटो पाहून तुम्ही तिच्या वयाचा अंदाज बांधू शकत नाही. व्हायरल होणाऱ्या या फोटोंवरून तुम्ही नजरही हटवू शकत नाही.

yalina1

यलीना हिला आकाशातून पृथ्वीतलावर उतरलेली छोटी परी असेच म्हटले जाते. सहा वर्षाच्या या चिमुरडीचे सोशल मीडियावरही हजारो चाहते आहेत. इन्स्टाग्रामवर तिचे जवळपास 21 हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

yalina3

यलीना ही या वयातही जगातील अनेक नामांकित फॅशन कंपन्यांसोबत करारबद्ध आहे. ती मोनालिसा किड्स आणि ग्लेरिया जिन्ससारख्या कंपन्यांच्या जाहिराती करते. तिच्या चेहऱ्यावरील मनमोहक हास्य दिलखेचक असते.

yalina

आपली प्रतिक्रिया द्या