पुतीन यांची लोकप्रियता कायम, ठरले रशियातील सर्वात ‘हँडसम पुरुष’

रशियन संसदेमधील वरिष्ठ सभागृहाने नुकताच राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांना आणखीन दोनवेळा राष्ट्राध्यक्ष होण्याची संधी देण्याचा कायदा संमत केला. त्यामुळे पुतीन हेच 2036 पर्यंत राष्ट्राध्यक्ष राहणार आहेत. पुतीन यांची लोकप्रियता सर्वसामान्यांमध्ये आजही कायम असल्याचे एका सर्वेक्षणामधून पुन्हा एकदा दिसून आले आहे. हजारो जणांचा समावेश असणाऱ्या या सर्वेक्षणामध्ये 68 वर्षीय पुतीन हे ‘सर्वात हँडसम पुरुष’ ठरले आहेत. ‘सुपरजॉब डॉय आरयू’ नावाच्या वेबसाईटने रशियन जनतेला देशातील कोणती व्यक्ती सर्वात सुंदर वाटते यासंदर्भात करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये अनेकांनी पुतीन यांच्या नावाची निवड केल्याचे पाहायला मिळाले. सर्वेक्षणातील 18 टक्के पुरुषांनी तर 17 टक्के महिलांनी पुतीन यांची निवड केली. रशियन जनतेच्या मनात आजही पुतीन हेच देशातील सर्वात सुंदर व्यक्ती असल्याचे चित्र या सर्वेक्षणातून स्पष्ट झाल्याचे वेबसाईटने सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या