खेळापेक्षा सुंदर ललनांवरच टीव्ही वाहिन्यांचा फोकस : फिफाचा आरोप

सामना ऑनलाईन | मॉस्को

रशियातील फिफा विश्वचषकाच्या संयोजनावर खुश असणाऱ्या जागतिक फुटबॉल महासंघाने (फिफा) स्पर्धेच्या प्रसारणावरून रशियन टी व्ही वाहिन्यांना चांगलेच फैलावर घेतले आहे. वर्ल्ड कपचे प्रसारण करताना या वाहिन्यांनी खेळापेक्षा सुंदर ललनांवरच जास्त फोकस केला असल्याचा आरोप फिफाने केला आहे. खेळातील तत्वांना (एथिक्स ) काळिमा लावणारा प्रकार रशियन टी व्ही वाहिन्यांनी केल्याचे फिफाच्या एथिक्स समितीचे म्हणणे आहे. अशा प्रकारांना भविष्यात आळा घालण्याचेही संकेत फिफाने दिले आहेत.

फिफाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विश्वचषकातील रशिया आणि सौदी अरेबिया संघांतील लढतीच्या प्रसारणात एका हॉट मॉडेलवरच अधिकाधिक कॅमेरा फोकस केला जात होता. त्या महिला मॉडेलने या प्रसारणाला बराच वेळ व्यापून टाकला होता.अशा प्रसारणावर बंदी नाही पण भविष्यात खेळाच्या पवित्र तत्वांना काळिमा लावणाऱ्या प्रकारांवर कसून लक्ष ठेवले जाईल असे फिफाचे डायव्हर्सिटी बॉस फेडेरिको येदीयेचि यांनी जाहीर केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या