रशियन महिलेवर बलात्कार पोलीस अधिकाऱ्याविरोधात तक्रार दाखल

1661

पोलीस अधिकारी भानुदास ऊर्फ अण्णासाहेब जाधव हे गेल्या 12 वर्षांपासून नशेच्या गोळ्या देऊन माझ्यावर बलात्कार करत आहेत. त्यांनी सुपारी किलरला सांगून मला ठार मारण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर त्यांच्यापासून मला एक मूल झाले असून त्याला देखील त्यांनी ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार एका रशियन महिलेने चेंबूर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. सुमेरा (नाव बदललेले, 38) या महिलेने पोलीस अधिकारी भानुदास जाधव यांच्या विरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात बलात्कार व ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार केली आहे. जाधव हे गेल्या 12 वर्षांपासून माझे लैंगिक शोषण करीत आहेत. नशेच्या गोळ्या देऊन ते माझ्यावर बलात्कार करायचे. मी रशियन नागरिक असतानाही जाधव यांनी मला जबरदस्ती हिंदुस्थानात कैद करून ठेवले आहे. माझा पासपोर्ट त्यांनी घेऊन ठेवला आहे. त्यांच्यापासून मला एका मूल देखील झाले पण ते मुलाला देखील ठार मारण्याच्या प्रयत्नात आहेत अशी तक्रार सुमेरा हिची आहे.

आपली प्रतिक्रिया द्या