
इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सला जेतेपद जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलणारा मराठमोळा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड लग्नबंधनात अडकला आहे.
ऋतुराज गायकवाड याने उत्कर्षा पवार हिच्यासोबत लगीनगाठ बांधली. शनिवारी मोठ्या थाटात दोघांचा विवाहसोहळा पार पडला.
ऋतुराजची पत्नी उत्कर्षा पवार ही अष्टपैलू क्रिकेटपटू आहे. तिने आपला शेवटचा सामना नोव्हेंबर 2021मध्ये सीनियर विमेंस वनडे ट्रॉफीमध्ये पंजाबविरुद्ध खेळला होता.
आयपीएलची फायनल जिंकल्यानंतर ऋतुराजने धोनी आणि उत्कर्षा सोबत एक फोटो शेअर केला होता. तसेच उत्कर्षाने धोनीचे चरणस्पर्श करत त्याचा आशीर्वादही घेतला होता.
उत्कर्षा पवार ही महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळते. ती लिस्ट ए क्रिकेटही खेळलेली आहे.