सॅमसंग आज दोन स्मार्टफोन लाँच करणार

22
४के एचडी डिस्प्ले, ६ जीबी रॅम, ६४ आणि १२८ जीबी मेमरी(इंटर्नल),१२ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा,८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, फिंगरप्रिंट सेन्सर, युएसबी सी टाईप चार्जर

सामना ऑनलाईन,मुंबई

सॅमसंग कंपनीच्या बहुचर्चित गॅलेक्सी एस-८ आणि गॅलेक्सी एस-८ प्लस हे स्मार्ट फोन हिंदुस्थानात लाँच होणार आहेत. सॅमसंगच्या या दोन्ही मोबाईलची स्क्रिन सॅमसंग एस-७प्रमाणेच कव्हर्ड एज देण्यात आली असून एस-८ आणि  एस-८ प्लस याफोनचे प्री-बुकिंग याआधीच सुरू झाले आहे.

सॅमसंगच्या गॅलॅक्सी एस-८ आणि गॅलेक्सी एस-८ प्लस या स्मार्ट फोनची स्क्रीन अनुक्रमे ५.८ आणि ६.२ इंच इतकी असून या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेंन्सर देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त  या फोनमध्ये ४-जीबी रॅम आणि १२ मेगा पिक्सलचा कॅमेरा देण्यात आला असून हे दोन्हीही फोन वॉटर तसेच डस्टप्रूफ आहेत. फ्लिपकार्ट या संकेतस्थळावर हा मोबाईल ग्राहकांना उपलब्ध होण्याचे संकेत असून त्याची किंमत ५५ हजार ते ६० हजार इतकी असण्याची शक्यता आहे.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या