सारेगम

आजच्या काळात संगीत हे पूर्णवेळ करीयर होऊ शकते.

प्रत्येकाच्या आयुष्यात संगीताचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पूर्वीच्या काळी तर संगीत मनोरंजनाचे एकमात्र साधन मानले जायचे. सध्या तर संगीताचे क्षेत्र बरेच व्यापक होत आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला ‘क्लासिकल म्युझिक’ असेही म्हटले जाते. हिंदुस्थानी अभिजात संगीत हे वेदकालापासून अस्तित्वात आहे, असे मानले जाते. शास्त्रीय संगीत ध्वनिप्रधान असते.

वाहिन्यांवरील सांगीतिक कार्यक्रम, लाइव्ह शो, स्पर्धात्मक संगीत कार्यक्रम अशा प्रकारच्या अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची तरुणांमध्ये क्रेझ आहे. ज्यांना गाण्याची आवड आहे ते या कलेत आपले करीयर घडवू शकतात. शास्त्रीय संगीताचे शिक्षण देणाऱ्या संस्था, विद्यालये, विश्वविद्यालयांत संगीतविषयक अभ्यासक्रम शिकवला जातो. संगीत कलेत डिप्लोमा, पदवी आणि पदविका अशा प्रकारे अभ्यासक्रमाची निवड करून शास्त्रशुद्ध संगीत शिकता येते.

मनोरंजन आणि समाजमाध्यमांचा वाढता विस्तार लक्षात घेता शास्त्रीय संगीताचे पद्धतशीर शिक्षण घेतलेल्या कलाकारांची आवश्यकता असते. चांगला संगीत शिक्षक होण्याकरिता माध्यमाची गरज लक्षात घेणेही आवश्यक असते. ज्यांना लय, तालाची योग्य समज आहे त्यांच्यासाठी करीयरमध्ये प्रगती करण्यासाठी बराच वाव आहे. यासाठी दररोज शास्त्रीय संगीताचा रियाज करण्याचीही आवश्यकता असते.

महाविद्यालयीन संस्था
१. अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय, २१२, दीनदयाळ उपाध्याय मार्ग, नवी दिल्ली
२. गंधर्व निकेतन, प्लॉट नं ५, सेक्टर ९ अ, वाशी, नवी मुंबई
३. गंधर्व महाविद्यालय, शनिवार पेठ, अप्पा बळवंत चौकाजवळ, पुणे
४. ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठ, संगीत विभाग, जुहू रोड, सांताक्रुझ (प.)
५. मुंबई विद्यापीठ, संगीत विभाग, विद्यापीठ विद्यार्थी भवन, बी रोड, चर्चगेट
६. आजीवासन संगीत विद्यालय, बी-६, माय फेअर बिल्डिंग, स्वामी विवेकानंद रोड, वांद्रे (प.)

कोर्सेस
बी.ए. (संगीत)
संगीत प्रमाणपत्र
संगीत पदवी आणि पदविका
कंठ आणि वाद्यसंगीत प्रवेशिका (पहिले आणि दुसरे वर्ष), मध्यमा (मध्यमा आणि तिसरे वर्ष), विशारद (पाचवे आणि सहावे वर्ष), अलंकार (सातवे आणि आठवे वर्ष)
संगीत आचार्य (पीएचडी)

शैक्षणिक पात्रता
शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही. असे असले तरी बारावीनंतर शास्त्रीय संगीताच्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकता.
सर्टिफिकेट, बॅचलर, डिप्लोमा, पदविका स्तरावरील शिक्षणही शास्त्रीय संगीतात घेता येते.
सर्टिफिकेट कोर्स एक वर्ष, बॅचलर पदवी कोर्स तीन वर्ष आणि पदविका स्तरावरील शिक्षणाचा कालावधी दोन वर्षांचा असतो.