साबरमती आश्रमात जाऊन ट्रम्प विसरले महात्मा गांधींना, पंतप्रधान मोदींचा उल्लेख ‘ग्रेट फ्रेंड’

1210

हिंदुस्थानच्या दौऱ्यावर असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सोमवारी अहमदाबाद येथे दाखल झाले. तिथून त्यांनी साबरमती आश्रमालाही भेट दिली. मात्र, आश्रम भेटीत ट्रम्प यांना महात्मा गांधी यांचा विसर पडल्याचं चित्र आहे. कारण, आश्रमाच्या प्रतिसाद वहीत त्यांनी पंतप्रधानांचा उल्लेख केला असून महात्मा गांधींबद्दल मात्र एकही शब्द लिहिलेला नाही.

अहमदाबाद येथील विमानतळावर उतरल्यानंतर साबरमती नदीच्या काठावर असलेल्या साबरमती आश्रमाला ट्रम्प यांनी सपत्नीक भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोघांचे शेला देऊन स्वागत केलं. त्यानंतर पंतप्रधानांनी त्यांना संपूर्ण आश्रम फिरून दाखवला. ट्रम्प यांनी महात्मा गांधी यांचा ऐतिहासिक चरखाही चालवला. पतंप्रधानांनी त्यांना चरख्यावरील सुतकताईविषयी माहिती दिली. त्यानंतर पंतप्रधानांनी ट्रम्प दांपत्याला बापुजींची प्रसिद्ध तीन माकडं दाखवली आणि त्याविषयीही माहिती दिली.

trump-visitor-sabarmati

आश्रम पाहून झाल्यानंतर ट्रम्प यांच्यासमोर व्हिजिटर बुक अर्थात प्रतिसाद वही आणली गेली. त्यात ट्रम्प यांनी या वहीत नरेंद्र मोदी यांचा उल्लेख ग्रेट फ्रेंड असा करत या दौऱ्याबद्दल आभार मानले. परंतु, त्यात महात्मा गांधी यांचा उल्लेखही केला नाही. या प्रतिक्रियेचा फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या