सचिन पायलट यांनी घेतली राहुल, प्रियंकाची भेट, राजस्थानमधील राजकीय नाट्य संपण्याची शक्यता

1090

माजी मुख्यमंत्री सचिन पायलट यांनी 19 आमदारांसह बंडखोरी केल्याने राजस्थानमधील काँग्रेसचे सरकार डळमळीत झाले होते. आता पायलट यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजस्थानमधील राजकीय नाट्य संपण्याची शक्यता निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सचिन पायलट यांनी सोमवारी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतली. 14 ऑगस्ट रोजी राजस्थान विधानसभेचे सत्र सुरू होणार आहे. या भेटीत सचिन पायलट यांनी राहुल गांधीसमोर आपल्या समस्या आणि परतण्याची शर्ती सांगितल्या.  अशोक गेहलोत ऐवजी दुसर्‍या व्यक्तीला मुख्यमंत्री बनवा अशी अट पायलट यांनी घातल्याचे समजते. तसेच तशी अधिकृत घोषणाही करण्याची मागणी पायलट यांनी केली आहे.

ही अट जर मान्य न केल्यास पायलट यांच्या गटातील दोन वरिष्ठ नेत्यांपैकी एकाला उपमुख्यमंत्रीपद आणि मंत्रिपद देण्याची अट पायलट यांनी दिली आहे. सचिन पायलट यांनी दिल्लीत राष्ट्रीय महासचिव पदाची मागणी केली आहे. तसेच काँग्रेसमध्ये सन्मानाने परत घेऊन तशी अधिकृत घोषणा करावी असेही पायलट यांनी सांगितएल अहे.

असे असले तरी राहुल गांधी यांनी अजून कुठलीही अट मान्य केलेली नाही. तसेच पायलट यांनी राज्यात परतून उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदाची जवाबदारी घ्यावी असे निर्देश दिले आहेत. सरकारच्या कामकाजासाठी एक समिती बनवली जाईल असेही राहुल गांधींनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या