काँग्रेस नेत्यानं गायलं ‘जीना यहाँ मरना यहाँ’; नेटकऱ्यांनी पाडला धम्माल कमेंट्सचा पाऊस

sachin-pilot

काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी मंगळवारी ट्विटरवर राज कपूर यांचे लोकप्रिय गाणे ‘जीना यहाँ मरना यहाँ’ गातानाचा व्हिडीओ पोस्ट केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर आतापर्यंत 2 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ जयपूरमधील लाइव्ह कॉन्सर्टचा आहे. या छोट्या व्हिडीओमध्ये सचिन पायलट काही लोकांसोबत स्टेजवर दिसत आहेत. त्यांच्या हातात माईक देखील आहे आणि यादरम्यान ते 1970 मध्ये आलेल्या ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटातील गाण्याच्या काही ओळी गात आहेत. कोरसमध्ये त्याच्यासोबत आणखी लोक त्यांना साथ देताना दिसतात.

सचिन पायलट यांनी त्यांच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये गाण्याचे बोल लिहिले आहेत, “जीना यहाँ, मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ.” त्यांचा आवाज लोकांना खूप आवडला आहे. त्यांचा असा सुरेल आवाज ऐकून लोकही त्यांच्या गायकीचे चाहते झाल्याचे लोक सांगतात. बरेच लोक असेही म्हणतात की ते एक चांगला नेता असण्याबरोबरच एक चांगले गायक देखील आहेत.

लोक व्हिडीओवर भरपूर कमेंट करत आहेत आणि सचिन पायलट यांच्या आवाजाचे कौतुक करत आहेत. एका यूजरने म्हटले, “चांगला आवाज सचिन जी,” दुसऱ्या यूजरने “तुमचा आवाज खूप गोड आहे” अशी कमेंट केली.

‘जीना यहाँ मरना यहाँ’ हे गाणे मुकेश यांनी गायले आहे. संगीत शंकर जयकिशन यांनी दिले होते आणि गीत शैलेंद्र आणि शैली शैलेंद्र यांनी लिहिले होते.

तर काही यूझर्सने खिल्लीही उडवली आहे. एका यूझरने म्हटले आहे की, ‘सर राहू द्या, आमदार कमी पडले नाही तर तुम्ही भाजपमध्ये जाण्याची पूर्ण तयारी केली होती.