सचिन पायलट राजस्थानचे मुख्यमंत्री होणार; गेहलोत यांच्या मंत्र्याचा दावा

काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अध्यादेश जारी करण्यात आल्यानंतर काँग्रेसमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी नामांकन दाखल करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर राजकीय तर्कवितर्क वर्तवण्यात येत आहे. गेहलोत काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यास राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडणार का, याबाबतच्या चर्चा सुरू आहेत. याबाबत गेहलोत सरकारमधील मंत्र्याने महत्त्वाचा दावा केला आहे.

गेहलोत सरकारमधील मंत्री राजेंद्र गुढा यांनी राजस्थानचे पुढचे मुख्यमंत्री सचिन पायलट असतील असा दावा केला आहे. पायलट यांच्यासोबत सर्व आमदार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अशोक गेहलोत यांना पांठिबा देणारे आमदारही पायलट यांना समर्थन देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. बसपा सोडून काँग्रेसमध्ये आलेले आमदारही पायलट यांच्यासोबत आहेत. त्यामुळे सचिन पायलट हेच राजस्थानचे मुख्यमंत्री होतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.