हिंदुस्थानातील सर्वात विश्वासार्ह बँक असलेल्या बँक ऑफ बडोदाला जागतिक स्तरावरही तीच विश्वासार्हता मिळावी म्हणून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची जागतिक ब्रॅण्ड अॅम्बेसेडरपदी निवड करण्यात आली आहे आणि यानिमित्ताने बीओबी मास्टरस्ट्रोक बचत खाचेही सुरू केले आहे. असलेल्या बँकांपैकी एका बँकेने आज क्रिकेट क्षेत्रातील लेजंड सचिन तेंडुलकर यांची बँकेच्या जागतिक ब्रँड अम्बेसिडरपदी नियुक्ती जाहीर केले आहे. बँक ऑफ बडोद्याने सचिनचा समावेश असलेले ‘प्ले द मास्टरस्ट्रोक’ हे नवे पॅम्पेन सुरू केले असून हे पॅम्पेन लोकांना बँकेची निवड करून मास्टरस्ट्रोक खेळण्यासाठी प्रोत्साहन देणारे आहे. बँक सध्या जगभरातील 17 देशांत कार्यरत असून जागतिक क्रीडा आयकॉन या नात्याने सचिन बँकेच्या ब्रँडला आंतरराष्ट्रीय स्तरावर नव्या उंचीवर घेऊन जाण्यास मदत सहकार्य करणार आहे, असा विश्वास बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी देवदत्त चंद यांनी व्यक्त केला आहे.