सचिनने गोव्यात अनुभवला बॅड रोड बडीजचा थरार

29

सामना प्रतिनिधी । पणजी

माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर सध्या ऑफ रोड कार रेसिंगमध्ये जोरदार फटकेबाजी करु लागला आहे. गोव्यात रविवारी अपोलो टायर्सतर्फे आयोजित बॅड रोड बडीजच्या समारोप सोहळयाला सचिनने फक्त हजेरी लावली नाही तर मैदानात उतरून त्याने चढउतार पार करत आपण या खेळातही मास्टर ब्लास्टर होऊ शकतो, हे दाखवून दिले.

सचिनचे गाडयांबाबतचे प्रेम सर्वश्रूत आहे. गोव्यात यापूर्वी कार्ट रेसिंग ट्रॅकवर सचिन चौफेर फटकेबाजी करताना दिसला होता. सचिनने आपली ऑफ रोड रेसिंगमध्ये कार चालवण्याची हौस परदेशात भागवली होती. देशात पहिल्यांदाच रविवारी गोव्यात ऑफ रोड रेसिंगसाठी तो मैदानात उतरला. दक्षिण गोव्यातील केपे येथील पठारावर नैसर्गिक ट्रैकवर सचिन कार घेऊन मैदानात उतरला आणि त्याने आपले लक्ष्य साध्य करून सगळ्यांना चकित केले.त्यानंतर सहचालक बनून सचिनने आणखी एक थरार अनुभवला जो प्रशिक्षित ऑफ रोड रेसर्स करतात.एका चीरेखाणीत खास नैसर्गिकरित्या तयार झालेल्या खडयात कार उतरवून ती बाहेर काढण्याचा अनुभव ग्रेट होता असे सचिनने सांगितले.सचिनने बॅड रोड बडीजशी संवाद साधताना बॅड रोड बडीज हे चांगले चालक असल्याचे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या