सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेचा प्रारंभ

47

सामना प्रतिनिधी, कोल्हापूर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आलेले कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज ‘रयत क्रांती संघटना’ या त्यांच्या नव्या शेतकरी संघटनेची घोषणा केली.

घटस्थापनेच्या मुहूर्तावर सदाभाऊ खोत यांनी कोल्हापूर येथे नव्या संघटनेचा प्रारंभ केला. या संघटनेच्या माध्यमातून सहा महिन्यांत प्रत्येक तालुक्यातून तब्बल १७ लाख सभासद करण्याचा संकल्पही खोत यांनी यावेळी केला. दरम्यान, या ‘रयत क्रांती’च्या माध्यमातून खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे.

खोत म्हणाले, आपण ३२ वर्षे शेताची नांगरणी केली. त्याचा म्होरक्या वेगळा ठेवला होता. खळं दुसराच घेऊन जात होता. आता मात्र नांगरण मी करणार असून, खळं मात्र रयतेच्या मालकीचे असेल, असे सांगत खोत यांनी शेट्टी यांचे नाव न घेता टीका केली.

आपली प्रतिक्रिया द्या