सदाभाऊ खोत यांची नवी संघटना घटस्थापनेला

36

सामना प्रतिनिधी । कराड

घटस्थापनेदिवशी छत्रपती शाहू महाराज आणि अंबाबाईचे दर्शन घेऊन नव्या संघटनेची स्थापना केली जाईल. ‘संवादातून संघर्षाकडे’ असे नव्या संघटनेचे ब्रीदवाक्य आहे अशी घोषणा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे दिली. कराडमध्ये एका कार्यक्रमासाठी ते आले होते त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

सदाभाउ खोत म्हणाले, संघटनेचे नाव काय असावे यासाठी १६ जणांची समिती गठीत केली आहे. २० तारखेला त्यांची बैठक होऊन त्यामध्ये नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. तसेच ही संघटना सर्वांना बरोबर घेऊन काम करेल. मी चळव ळीतला कार्यकर्ता आहे. कोण काय म्हणतंय त्यापेक्षा मी काय करायचे यावर भर देणार असून मी स्पर्धा करत नाही असा खुलासाही खोत यांनी केला.

मी माढा मतदारसंघात जाऊन निवडणूक लढवली. हातकणंगले तर माझा घरचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणूक का लढवू नये असा सवाल करीत खोत म्हणाले, आतापर्यंत केंद्राने कर्जमाफी दिली होती, मात्र राज्याने एवढी मोठी कर्जमाफी देण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा निश्चितपणे लाभ होईल. आतापर्यंत ५० लाख शेतकऱ्यांनी ऑनलाइन फॉर्म भरले आहेत, जे कर्जमाफी फसवी आहे असे म्हणत आहेत. मग ५० लाख शेतकरी फसवे आहेत का, त्यांनी अर्ज भरले कसे, असा सवालही त्यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या