सदाशिवराव मंडलिक स्मृती पुरस्काराची रक्कम दुर्गम व डोंगराळ भागातील हॅास्पिटलसाठी सुपूर्द – खासदार मंडलिक

628

लोकनेते, दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या स्मृती दिनानिमित्त देण्यात येणा-या विविध पुरस्कारांची रक्कम आज कोविड लढ्यासाठी दुर्गम व डोंगराळ भागातील हॅास्पिटल सक्षमीकरण करण्यासाठी देण्यात आली. समितीच्यावतीने शिवसेना खासदार प्रा.संजय मंडलिक यांनी हा तीस लाखांचा निधी चेकद्वारे जिल्हा प्रशासनाकडे सुपुर्द केला.

सदाशिवराव मंडलिक स्मृती पुरस्कार वितरण समितीने घेतलेल्या निर्णयानुसार आज तीस लाखाचा चेक खासदार संजय मंडलिक यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जि.परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख व आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा चे उपाध्यक्ष संजय पवार,आमदार प्रकाश आबिटकर, व्ही.बी.पाटील, जे.एफ.पाटील, सुर्यकांत पाटील-बुध्दीहाळकर, मारुतराव खापरे, मंडलिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. विरेंद्र मंडलिक, विज्ञान मुंडे, ॲड.सुरेश कुराडे आदी समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

ग्रामिण भागातील रुग्णालयांचे सक्षमीकरण होवून, ग्रामस्थांना चांगल्या आरोग्य सुविधा त्यांच्या गावाजवळ मिळाव्यात असे दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे स्वप्न होते.  त्यासाठी चंदगड पासून गगनबावड्यापर्यंतच्या ग्रामिण रुग्णालयांना सक्षमीकरण करण्यासाठी हि रक्कम वापरण्यात येणार आहे.तसेच यापुर्वी खासदार निधीतून एक कोटी, मित्रांकडुन सुमारे तीस लाख तर उद्योजकांना केलेल्या आवाहना नुसार दोन व्हेंटिलेटर अशी सुविधा या सर्व रुग्णालयांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा प्रशासनाकडे दिल्याचेही खासदार संजय मंडलिक यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या