लोडशेडींग विरोधात खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांचा कंदिल मोर्चा

सामना ऑनलाईन । भोपाळ

मध्यप्रदेशात उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला लोडशेडींग करून शॉक दिल्यामुळे कमलनाथ सरकारविरोधात भाजपच्या हातात आयतेच कोलीत मिळाले आहे. मध्यप्रदेशातील लोडशेडींग विरोधात भाजपने राज्यभर कंदिल मोर्चा काढून आंदोलन केले. या आंदोलनात भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर देखील हातात कंदील घेऊन रस्तायवर उतरल्या.

मध्यप्रदेशात लोडशेडींग विरोधात भाजपकडून बुधवारी राज्यभर कंदिल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, भाजप प्रदेशाध्यक्ष राकेश सिंह यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते. यावेळी साध्वी प्रज्ञा सिंह यांनी ‘मध्य प्रदेशात आता जंगलराज खपवून घेतले जाणार नाही’ असे म्हणत कमलनाथ सरकारला लक्ष्य केले. तर माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ हे आता ‘कलंकनाथ’ झाले असून काँग्रेसच्या राज्यात मूली सुरक्षित नसल्याचा घणाघात केला.

आपली प्रतिक्रिया द्या