खांडेकरांची बलात्कारावरील कविता; पुस्तकाच्या विक्री प्रसारावर गोव्यात बंदी

976

सामूहिक बलात्कारवर लिहिलेल्या कवितेतील दोन शब्द अश्लील असल्याचे सांगत गोवा कोकण साहित्य आकादमीने कविता संग्रहाच्या खरेदी विक्रीवर बंदी आणली आहे. नीलबा खांडेकर यांच्या ‘द वर्ड्स’ या कविता संग्रहाची अकादमीने खरेदी थांबवली आहे.

नीलबा खांडेकर यांने ‘द वर्ड्स’ या नावाने एक कविता संग्रह लिहिला आहे. या कविता संग्रहात त्यांनी सामूहिक बलात्कारावर एक कविता लिहिली असून त्यात थन आणि योनी अशा दोन शब्दांचा समावेश आहे. हे शब्द अश्लील असल्याचे गोवा कोकण साहित्य अकादमीने सांगितले आहे. परंतु हीच कविता कलाकृतीचा उत्तम नमुना असल्याचे भारतीय साहित्य आकादमीने म्हटले आहे.

स्नेहा मोरजकर या गोवा कोकण साहित्य अकादमीच्या अध्यक्षा आहेत. त्यांनीच हे शब्द अश्लील असल्याचा शेरा देत कविता संग्रहाच्या खरेदी विक्रीवर बंदी घातली आहे. हा निर्णय समितीच्या तीन सदस्यांचाही होता माझ्या एकटीचा नवे अशी प्रतिक्रिया मोरजकर यांनी दिली आहे. मी स्वतः ती कविता वाचली आहे, त्यात मला चुकीचे वाटले नाही. परंतु हा समितीचा निर्णय आहे त्यामुळे पुस्तकाची खरेदी थांबवण्यात आली असेही त्या म्हणाल्या.

ही कविता अश्लील कशी काय असा प्रश्न लेखक नीलबा खांडेकर यांनी माहितीच्या अधिकारात विचारला आहे. खांडेकर यांनी दोन अर्ज गोवा कोकण आकादमी तर दोन अर्ज त्यांनी केंद्रीय भाषा संचालनालयाला पाठवल्या आहेत. ही कविता आक्षेपार्ह किंवा अश्लील असल्याचे कुठलेच पत्र गोवा कोकण साहित्य आकादमीने पाठवले नसल्याचे उत्तर साहित्य अकादमीने दिले आहे.

जर कवितेतील ते दोन शब्द काढले तर पुस्तकाच्या खरेदीवरील बंदी उठवण्यात येईल असे मत समितीतील दोन सदस्यांनी केले आहे. परंतु पुस्तक आधीच छापून आले आहे, ते शब्द आता काढू शकता येणार नाही, असे लेखक खांडे यांनी सांगितले आहे. तसेच पुस्तक विकत घेण्यापूर्वी आकादामेनी अश्लील शब्दाची व्याख्या ठरवून त्याबाबत धोरण ठरवावे, अशी मागणीही खांडेकर यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या